(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्ती अर्ज करण्याचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या

मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्ती अर्ज करण्याचे आवाहन

 


 

            मुंबईदि. 17 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीविमुक्त जाती भटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता -https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी. हे महाडिबीटी पोर्टल 14 डिंसेबर 2021 पासून सुरू झालेले आहे.

         अनुसूचित जातीविमुक्त जाती भटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता नवीन तसेच नूतनीकरणाकरीता (Fresh/Renewal) दिनांक 31 जानेवारी 2022 अंतिम मुदत आहे.अनुसूचित जातीविमुक्त जाती भटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक  वर्ष 2020-21 करीता पुन्हा अर्ज करण्यासाठी दिनांक 31 जानेवारी 2022 अंतिम मुदत आहे.

         मुंबई उपनगर जिल्हा अधिनस्त कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करण्यात येते कीमहाविद्यालय लॉगीनला प्राप्त  झालेले विद्यार्थ्यांच्या अर्जांची योग्य ती छाननी करुन पात्र अर्ज जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगीनला मंजूरी करीता तत्काळ पाठवावेत. अशी माहिती मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget