(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ड्रोनद्वारे लस पुरवठा करण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला सुरुवात | मराठी १ नंबर बातम्या

ड्रोनद्वारे लस पुरवठा करण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला सुरुवात

 


कोविड लसीकरणास गती मिळेल

- अपर मुख्य सचिव डॉ.प्रदिप व्यास

 

            मुंबईदि. 16 : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात ड्रोनद्वारे कोविड प्रतिबंधक लस पुरवठा करण्याच्या नाविन्यपूर्ण प्रयोगास आज सुरुवात करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या उपक्रमाला सुरुवात झाली. या उपक्रमामुळे राज्यातील कोविड प्रतिबंधक लसीकरणास गती येईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ब्लु इन्फिनिटी इनोवेशन लॅब व आय आय एफ एल फाऊंडेशनच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

            या उपक्रमामध्ये ड्रोनद्वारे लसवाहतुकीमुळे अतिदुर्गम भागात जलद गतीने लस पोहोचविता येईल. यामुळे शीतसाखळी अबाधित राहील. तसेच प्रवासादरम्यान वेळेची व मनुष्यबळाची बचत होईलअसे डॉ. व्यास यांनी सांगितले.

            हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील काळात ड्रोनद्वारे अत्यावश्यक औषधे पाठविणेरक्त पाठविणेप्रत्यारोपणाकरिता अवयव एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत पाठविणे विनाअडथळा व अत्यंत कमी वेळेत सहज शक्य होईल.

            सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या संकल्पनेतून आणि अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यासआयुक्त डॉ. रामास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्याच्या आरोग्य विभागजिल्हा परिषद यांचा सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

            यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा वैदही वाढाणजिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळमुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठउपसंचालकडॉ. गौरी राठोड,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय काळबांडे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सुर्यवंशी,  माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलींद चव्हाणसहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सागर पाटील तसेच तालुक्यातील वैद्यकिय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारीआशा स्वयंसेविका उपस्थित होते.

००००

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget