(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्र फिल्म सेलने संकेतस्थळ युजर फ्रेंडली करावे - सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख | मराठी १ नंबर बातम्या

महाराष्ट्र फिल्म सेलने संकेतस्थळ युजर फ्रेंडली करावे - सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

 


            मुंबई दि. 16 : मुंबई व उपनगर परिसरात चित्रपट निर्मितीदूरचित्रवाणी मालिकाजाहिरातीमाहितीपटवेबसिरीज इत्यादीच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानगी महाराष्ट्र फिल्म सेलअंतर्गत एक खिडकी योजनेतून दिल्या जातात. महाराष्ट्र फिल्म सेलने संकेतस्थळ (http://www.filmcell.maharashtra.gov.inयुजर फ्रेंडली करण्यावर भर द्यावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.

            चित्रनगरी संदर्भातील आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. बैठकीस चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे,  सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरेअजय सक्सेनासांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            श्री. देशमुख म्हणाले की‘राज्याच्या विविध जिल्हयांमध्ये विविध माध्यमांसाठी चित्रीकरण सुरु असते. एक खिडकी योजनेचे विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. विस्तारीकरण करीत असताना एक खिडकी योजना नेमके काय आहे याबाबत अधिकाधिक लोकांना समजणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र फिल्म सेलने संकेतस्थळ अधिकाधिक युजर फ्रेंडली करावी याबाबतची सोशल मिडीयावर प्रसिद्धी करावी’.

            राज्यात मराठीहिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपटदूरचित्रवाणी मालिकाजाहिरातपटमाहितीपट यांची निर्मिती होते. त्यांच्या चित्रिकरणासाठी आवश्यक त्या परवानग्या तातडीने उपलब्ध होण्यासह व्यवसाय सुलभतेसाठी (Ease of doing business)चित्रिकरणासाठीच्या आवश्यक असणाऱ्या तीस हून अधिक परवानगी एक खिडकी योजनेतून देण्यात येतात. या योजनेअंतर्गत चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या परवानगी सात दिवसांच्या आत देण्यात येते. दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत या परवानगी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत असून निर्मात्यांना अटी शर्तीचे पालन करुन तसेच चित्रीकरणासाठी शुल्क भरुन परवानगी देण्यात येते.

००००

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget