(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); वरळी सिलेंडर स्फोट प्रकरण : भाजपाकडून स्थायी समिती सभा तहकुबी | मराठी १ नंबर बातम्या

वरळी सिलेंडर स्फोट प्रकरण : भाजपाकडून स्थायी समिती सभा तहकुबीमुंबई : नायर रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सिलेंडर स्फोटात भाजलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. या प्रकरणी भारतीय जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेतला असून मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या पालिका प्रशासन, सत्ताधारी आणि नायर रुग्णालयातील डॉक्टरांच्या उदासीन कृतीचा निषेध करत भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समिती सभेत संपूर्ण सभा तहकुबी मांडली.

वरळीतील गणपतराव जाधव मार्गावरील कामगार वसाहतीत बीडीडी चाळीतील एका खोलीमध्ये मंगळवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये सहा महिने वय असलेल्या एका तान्ह्या बाळासह पाच वर्षे वयाचा मुलगा, एक महिला आणि एक पुरुष असे चौघे जण भाजले होते. या चारही रुग्णांना नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नायर रुग्णालयात प्रशासनाच्या / डॉक्टरांच्या निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे सुरुवातीच्या सुरुवातीच्या एक तासापेक्षा जास्त वेळ (गोल्डन अवर) डॉक्टरांनी कोणतेही उपचार न केल्यामुळे त्यातील छोट्या बालकाचा मृत्यू झाला. केवळ युवराजांच्या हट्टापोटी भारतीय प्राणी / पक्षी सोडून परदेशी पेंग्विनवर दररोज रु.१.५ लाख रुपये खर्च करण्याऱ्या सत्ताधारी पक्षाला या बालमृत्यूचे सोयरसुतक नाही. कारण ही घटना घडल्यानंतर नायर रुग्णालयात सत्ताधारी महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष, आरोग्य समिती अध्यक्ष यापैकी  कोणी  फिरकले सुद्धा नाहीत अथवा  अथवा त्यांनी साधी दखल सुद्धा घेतली नाही. मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणेवर दरवर्षी रु. ४५०० कोटी खर्च करते.त्यानंतरही अशा घटना घडतात ही बाब अत्यंत वेदनादायी, चिंताजनक, निंदनीय व शरमेची असून मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनाला भूषणावह नसल्याची टीका भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.

सभा तहकुबीवर साधक-बाधक चर्चा होऊन ती एकमताने मंजूर झाली आणि सभागृह कोणतेही कामकाज न करता पूर्ण दिवसासाठी तहकूब करण्यात आले.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget