मुंबई, दि. 21 : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांचे मार्फत बेरोजगार उमेदवारांकरीता 12 ते 17 डिसेंबर, 2021 रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याची मुदत आता 20 ते 25 डिसेंबर, 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त छाया कुबल यांनी दिली.
मुंबई शहर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
लॉकडाऊननंतर नव्याने व्यवसाय/उद्योग सुरु करताना जिल्ह्यातील आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्बळाची गरज निर्माण झाली असून स्थानिक बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्यातील नामांकित उद्योजक/आस्थापनांमध्ये रिक्त असलेली विविध प्रकारची सर्वसाधारपणे 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर तसेच बीई व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी रोजगाराची संधी आहे. राज्यभरातून 25 हजार पेक्षा जास्त रिक्तपदांसाठी उद्योग/आस्थापनांमार्फत https://rojgar.mahaswayam.gov.
या राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.
000
टिप्पणी पोस्ट करा