पुणे, दि. 31 :- "महाराष्ट्र शूरांची भूमी असून राज्याला शौर्य, त्याग, पराक्रम, बलिदानाची गौरवशाली परंपरा आहे. स्वत्व, स्वाभिमानासाठी आत्मबलिदान करणाऱ्या वीरांचा हा महाराष्ट्र आहे. कोरेगाव भीमाचा इतिहासही महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे. कोरेगाव भीमाच्या ऐतिहासिक लढाईत लढलेल्या, शहिद झालेल्या वीरांना मी विनम्र अभिवादन करतो. कोरेगाव भीमाच्या ऐतिहासिक लढाईतील वीरांना वंदन करण्यासाठी येणाऱ्या बंधू-भगिनींबद्दल आदर व्यक्त करून जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या बांधवांनी कोरोना प्रतिबंधक नियम तसेच आदर्श कोरोना आचारसंहितेचे पालन करावे, शक्यतो आपापल्या घरूनच जयस्तंभास अभिवादन आणि शहीद वीरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी," असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
*****
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
भीमा-कोरेगाव येथे मानवंदना अर्पण करणार
मुंबई, दि. 31 : भीमा - कोरेगाव येथे मानवंदना अर्पण करण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे 1 जानेवारी 2022 रोजी भीमा - कोरेगाव येथे सकाळी 11.30 वाजता उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर 12 वाजता ते वढू-बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला भेट देवून अभिवादन करणार आहेत.
0000
टिप्पणी पोस्ट करा