(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे ३ जानेवारीपासून कोविड लसीकरण | मराठी १ नंबर बातम्या

१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे ३ जानेवारीपासून कोविड लसीकरण*पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बीकेसी कोविड केंद्रात होणार शुभारंभ*


*मुंबईत एकूण ९ कोविड लसीकरण केंद्र निर्देशित*


*१५ ते १८ वर्षे वयोगटातील, मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांसह इतर मुलांनाही विनामूल्य मिळणार लस*


*ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणीची देखील सोय*


*पालकांनी, आपल्या पाल्यांना नजीकच्या केंद्रावर आणून लसीकरण करुन घ्यावे* 


मुंबई : कोविड – १९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम अंतर्गत १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची मोहीम सोमवार, दिनांक ३ जानेवारी २०२२ पासून मुंबईत सुरु होणार असून त्यासाठी एकूण नऊ लसीकरण केंद्र निर्देशित करण्यात आली आहेत. या केंद्रावर, महानगरपालिकेच्या शाळांमधील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसह इतरही मुलांना विनामूल्य लस देण्यात येणार आहे. राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकूल कोविड लसीकरण केंद्रातून या मोहीमेचा सोमवार, ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शुभारंभ होणार आहे.


याप्रसंगी मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर, उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दिनांक ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड १९ लसीकरण विनामूल्य सुरु करण्‍यात येत आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, सदर वयोगटाच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन या लसीचा वापर करण्यात येणार आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसह इतरही मुलांचे विनामूल्य लसीकरण करण्यासाठी मुंबईत एकूण ९ समर्पित केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व संबंधित पालकांनी आपापल्या पाल्यांची नोंदणी करुन घ्यावी आणि पाल्यांचे लसीकरण करुन घ्यावे, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. 

लसीकरणासाठी १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना केंद्रावर थेट येवून नोंदणी (onsite / walk in) करून लस घेता येईल. तसेच ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून नोंदणीची सोय उपलब्ध राहणार आहे.

मुंबईतील ९ निर्देशित लसीकरण केंद्रांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. ए, बी, सी, डी, ई या पाच प्रशासकीय विभागांसाठी भायखळामधील रिचर्डसन क्रूडास भायखळा कोविड लसीकरण केंद्र; एफ/उत्तर, एल, एम/पूर्व, एम/पश्चिम या चार विभागांसाठी शीव (सायन) येथील सोमय्या मैदानावरील जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र; एफ/ दक्षिण, जी/ दक्षिण, जी/उत्तर या तीन विभागांसाठी वरळीतील एनएससीआय डोम जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र; एच/पूर्व, के/पूर्व, एच/पश्चिम या तीन विभागांसाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील बीकेसी जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र; के/ पश्चिम, पी/ दक्षिण या दोन विभागांसाठी गोरेगाव (पूर्व) मधील नेस्‍को जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र; आर/ दक्षिण, पी/ उत्तर या दोन विभागांसाठी मालाड (पश्चिम) मधील मालाड जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र, आर/ मध्य, आर/ उत्तर विभागांसाठी दहिसर जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र, एन, एस विभागांसाठी कांजूरमार्ग (पूर्व) मधील क्रॉम्‍प्‍टन ऍण्ड ग्रीव्‍हस् जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र, टी विभागासाठी मुलूंड (पश्चिम) मधील रिचर्डसन क्रूडास मुलूंड जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र अशी ही नऊ केंद्र आहेत. 


या व्यतिरिक्त परळमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालय येथे रेल्वे कर्मचार्‍यांच्या १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी देखील लसीकरण केंद्र आहे. 


सन २००७ वा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले विद्यार्थी लसीकरणासाठी पात्र राहतील. लसीकरणानंतर ताप येणे, हात दुखणे अशी सौम्‍य लक्षणे क्वचित प्रसंगी आढळून येऊ शकतात, अशा वेळी घाबरुन न जाता वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधी घ्यावीत. त्‍याचप्रमाणे इतर काही त्रास उद्भवल्‍यास नजीकच्‍या महानगरपालिका रुग्‍णालयात संपर्क साधावा. १५ ते १८ वर्षे वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांनी लसीकरण करुन घ्यावे तसेच सर्व पालकांनी या वयोगटातील आपापल्या पात्र पाल्यांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. 

===

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget