(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी शिक्षण हक्क अधिनियमानुसार खासगी प्राथमिक शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांवरील मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु · मुंबईत ३४३ पात्र शाळांमध्ये एकूण ६ हजार ४६९ जागा | मराठी १ नंबर बातम्या

शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी शिक्षण हक्क अधिनियमानुसार खासगी प्राथमिक शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांवरील मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु · मुंबईत ३४३ पात्र शाळांमध्ये एकूण ६ हजार ४६९ जागा

 




·        प्रवेश प्रक्रियेत मार्गदर्शनासाठी ५३ मार्गदर्शक मदत केंद्रांची निर्मिती

 

       मुंबई : शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ (आर. टी. ई.) अन्वये, शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी खासगी प्राथमिक शाळांमध्ये (अल्पसंख्याक शाळा वगळून) २५ टक्के आरक्षित जागांवरील मोफत प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. पाल्याच्या प्रवेशासाठी संबंधित पालकांनी अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

 

          शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अंतर्गत कलम १२ (१) (सी) अन्वये वंचित व दुर्बल घटकातील बालकांना नामांकीत खासगी विना अनुदानित शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश मिळू शकतो. त्यानुसार, मुंबई जिल्ह्यातील ३४३ पात्र शाळांमधील आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ६ हजार ४६९ जागा उपलब्ध आहेत.

 

          पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन आज (दिनांक १६ फेब्रुवारी २०२२) पासून पाल्याच्या प्रवेशासाठी शासनाच्या student.maharashtra.gov.in (www नाहीया संकेत स्थळावरून किंवा  education.maharashtra.gov.in (www नाहीया सरलच्या वेबसाईट मधील विद्यार्थी (Student) या टॅबमधील आरटीई पोर्टलवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावेत. अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाहीपालकांना या प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नयेम्हणून संपूर्ण बृहन्मुंबई क्षेत्रात  ५३ मार्गदर्शक मदत केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहेपालकांनी संकेतस्थळावरील हेल्प डेस्क (Help Desk) या पर्यायावर Mumbai BMC हा जिल्हा निवडून या मदत केंद्रांची यादी पहावीसदर केंद्रांवर मोफत अर्ज भरण्याची सुविधा असून त्याचा पालकांनी लाभ घ्यावा.

                                                                                                                                                                    

          जे पालक स्वत:हून तसेच इतर कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाईन  मोबाईल ऍप (Mobile App) द्वारे अर्ज करु शकतात,  त्यांना मदत केंद्रावर येण्याची आवश्यकता नाहीअर्ज करण्यापूर्वी पालकांनी संकेतस्थळावरील माहिती काळजीपूर्वक वाचावीतसेच नंतरही या प्रवेश प्रक्रियेबाबत अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी सदर संकेतस्थळाला वेळोवेळी भेटी द्याव्यात

         

          ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला आहे, अशा बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाहीप्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. प्रवेशासाठी  लागणाऱया सविस्तर माहितीसाठी महानगरपालिकेच्या mcgm.gov.in तसेच महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे शिक्षणाधिकारी (प्र.) श्री. राजू तडवी यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आवाहन केले आहे.

*****

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget