(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई ; रु. 111 कोटींची करचुकवेगिरी तपासात उघड | मराठी १ नंबर बातम्या

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई ; रु. 111 कोटींची करचुकवेगिरी तपासात उघड

 




करचुकवेगिरी प्रकरणी दोघांना सुरत येथून अटक

450 कोटी रुपयांहून अधिक रकमेची बनावट बिले जप्त

 

            मुंबई, दि. 12: महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने सहा महिने विभागास गुंगारा देणाऱ्या जोडप्यास गुजरातमधील सुरत येथून गुरुवार, 10 फेब्रुवारी, 2022 रोजी दुपारी अटक केली. त्यांच्याकडून 450 कोटी रुपयांहून अधिक रकमेची बनावट बिले जप्त करण्यात आली आहेत. मुंबई आणि सुरत शहर पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखा यांच्या भरीव सहकार्याने ही कारवाई पूर्ण करण्यात आली.

            मे. डॉल्फिन ओव्हरसीज (प्रोप्रायटरः प्रिमा म्हात्रे) आणि मे प्राईम ओव्हरसीन (प्रोप्रायटरः संजीव सिंग) या दोन कंपन्यांनी करचुकवेगिरी केल्याची गुप्त माहिती व्यापक सर्वसमावेशक विश्लेषण प्रणालीद्वारे अन्वेषण शाखेकडे प्राप्त झाली. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऑगस्ट 2021 मध्ये या कंपन्यांवर छापे टाकले असता पहिल्या दिवसापासून या दोन्ही कंपन्यांचे संचालक वैद्यकीय कारण देऊन चौकशीसाठी गैरहजर राहिले. त्यानंतर ते फरार झाले. विभागाच्या कोणत्याही नोटीसांना न जुमानता हे जोडपे महाराष्ट्राबाहेर पळून गेले. या जोडप्याने इतर व्यक्तिंच्या नावे बनावट कंपन्या काढून त्याद्वारे साधारण 482 कोटी रुपयांची बनावट बिले प्राप्त करून 111 कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याचे तपासात स्पष्ट झाले.

            प्रकरणाचे गांभीर्य पाहता महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने मुंबई पोलिसांच्या मदतीने व माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन या जोडप्याचा ठावठिकाणा शोधून काढला. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाचे व मुंबई पोलिसांचे पथक सुरतला रवाना झाले. सुरत शहर पोलिसांच्या गुन्हा शाखेच्या मदतीने व मुंबई पोलीस दलातील माहिम पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने या जोडप्याला सुरत येथे ताब्यात घेतले गेले. सुरत येथून या जोडप्यास शुक्रवारी पहाटे मुंबई येथे आणले गेले.

            मुंबई येथे न्यायालयापुढे हजर केले असता दोन्ही आरोपीना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण कारवाईचे नियोजन व अंमलबजावणी राज्यकर सहआयुक्त (अन्वेषण-ब) संपदा मेहताराज्यकर उपआयुक्त विनोद देसाईसहाय्यक राज्यकर आयुक्त ऋषिकेश वाघराज्यकर अधिकारी स्वाती शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी पार पाडली.

            महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर विभागाने परराज्यातून व इतक्या मोठ्या घोटाळ्यातील आरोपीस अटक करण्याची विभागाच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. भविष्यातही करचुकवेगिरी करणाऱ्या व्यक्तिंवर महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागपोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येईलअसा संदेश करदात्यांस देण्यासही विभाग यशस्वी ठरला आहे.

 000

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget