(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); भारतीय उद्योगांच्या विकासात भरीव योगदान देणारा देशाभिमानी उद्योजक गमावला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | मराठी १ नंबर बातम्या

भारतीय उद्योगांच्या विकासात भरीव योगदान देणारा देशाभिमानी उद्योजक गमावला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना

 

          मुंबई, दि.12: राहूल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेलाआणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारातरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राहूल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

            राहूल बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनात देशात क्रांती आणली तसेच जगातील या क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर भारताचे आव्हान उभे केले. त्यांनी केवळ आपल्या उद्योगाचा विकास असा संकुचित विचार केला नाही तर देशातील सर्वच उद्योगांच्या समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर स्पष्ट व निग्रही भूमिका घेतली. एक सच्चा देशभक्त उद्योजक म्हणून देशासमोरील काही समस्यांवर देखील त्यांनी भाष्य केले आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक कार्यही उद्योजकांनी सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी त्याचे उत्तम उदाहरण होते.

            राहूल बजाज हे विशेषत: उद्योजकांच्या युवा पिढीचे मार्गदर्शक होते. त्यांनी राज्य शासनाला देखील उद्योगाच्या विकासासंदर्भात वेळोवेळी महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.त्यांच्या जाण्याने निश्चितच राज्याच्या उद्योग विश्वाचे नुकसान झाले आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या श्रद्धांजलीपर संदेशात म्हणतात.

000


 

ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

सामाजिक भान असलेला भारतीय उद्योग क्षेत्रातील पितामह हरपला

-उपमुख्यमंत्री अजित पवार

            बजाज उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला भारतीय उद्योग जगतातील पितामह हरपला आहे. बजाज कंपनीच्या माध्यमातून भारताला ऑटो उद्योगात स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचे निधन हे भारतीय सामाजिकउद्योग क्षेत्राची मोठी हानी आहेअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

            उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतातगेल्या पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारुपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले. त्यांचा प्रदीर्घ अनुभवज्ञानदूरदृष्टीचा बजाज उद्योगासह भारतीय ऑटो उद्योगाच्या विकासात मोलाचा वाटा राहिला  आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात बजाज कंपनीमुळे भारताला स्वतंत्र ओळख मिळाली. स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जमनालाल बजाज यांचा देश सेवेचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला. उद्योग क्षेत्रात कार्यरत असूनही राहुल बजाज यांनी आयुष्यभर सामाजिक भान जपले. त्यांच्या दातृत्वाच्या गुणामुळे अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध राहिले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहेअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

000


 


भारतीय औद्योगिक विकासाला

गती देणारे व्यक्तिमत्व हरपले

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची राहुल बजाज यांना आदरांजली

            

बजाज उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष राहुल बजाज यांच्या निधनामुळे भारतीय औद्योगिक विकासाला गती देणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे अशा शोकभावना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज व्यक्त केल्या आहेत.

            श्री. पाटील यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे कीभारतीय औद्योगिक विश्वाला विशेषतः ऑटो उद्योगाला स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पुणेपिंपरी-चिंचवड आणि औरंगाबाद येथील उद्योग विश्वाची भरभराट करण्यात आणि या शहरांच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी विकसित केलेल्या अनेक वाहनांमुळे सामान्य माणसांच्या आशा आकांक्षां पूर्णत्वास गेल्या. 

            भारताला स्वयंचलित दुचाकी वाहन उद्योग क्षेत्राला नव्वदच्या दशकात स्वतंत्र ओळख मिळाली. यामध्ये राहुल बजाज यांच्या नेतृत्वाखालील बजाज कंपनीचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जमनालाल बजाज यांचा देश सेवेचा वारसा जपला. त्यांनी समाजातील दुर्बल वर्गासाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांना मदतीचा हात देऊन सामाजिक भान जोपासलेअसे श्री. पाटील यांनी संदेशात नमूद केले आहे.

000


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget