(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत 3 ते 25 मार्चपर्यंत | मराठी १ नंबर बातम्या

अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत 3 ते 25 मार्चपर्यंत

 




· विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

 

            मुंबईदि. 15 :- महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत गुरुवार दि. 3 मार्च 2022 रोजी सुरु होणार असून दि. 25 मार्च 2022 पर्यंत अधिवेशनाचे कामकाज  होणार आहे. असा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

            विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (ऑनलाईन उपस्थित) उपमुख्यमंत्री अजित पवारउपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेविधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकरविधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीससंसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परबमहसूल मंत्री बाळासाहेब थोरातनगरविकास मंत्री एकनाथ शिंदेगृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलइतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवारसंसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडेविधानपरिषद आणि विधानसभा  कामकाज सल्लागार समितीचे सदस्य वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रेविधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

            सन 2022-23 या वर्षाचा अर्थ संकल्प दि. 11 मार्च रोजी सादर करण्यात येणार आहे.  अधिवेशनाच्या सुरुवातीला कोविडच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन सर्वांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधकारक आहे तसेच कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

0000

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget