मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लहिरी यांचे मुंबईत निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून बप्पी लहिरी यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील क्रिटी केअर या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
बप्पी लाहिरी यांच्या पश्चात पत्नी चित्रानी लहिरी आणि त्यांची मुलगी – गायिका रेमा लहिरी बन्सल असा परिवार आहे. २०२० मध्ये बप्पी लाहिरी यांना कोरोनाची लागण झाली होती. ब्रीच कँडी रुग्णालयात काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मातही केली होती.
बप्पी लहिरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५३ झाला होता. बप्पी लहिरी यांचे मूळ नाव आलोकेश लहरी असे होते. बप्पी लहिरी यांना सोन्याचे दागिने घालण्याची प्रचंड आवड होती. बप्पी लहिरी यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक हिट गाणी दिली. १९७३ सालच्या 'नन्हा शिकारी' या चित्रपटाद्वारे बप्पी लहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मिथुन चक्रवर्ती यांच्या 'डिस्को डान्सर' या चित्रपटामुळे बप्पी लहिरी प्रकाशझोतात आले. बप्पी लहरी यांनी अनेक चित्रपटांमध्ये गायक आणि संगीतकार म्हणून काम केले.
टिप्पणी पोस्ट करा